Posts

National Peacock bird information in Marathi (राष्ट्रीय पक्षी मोरासंबंधी माहिती)

Image
मोर https://mr.wikipedia.org/s/2yo मोर   कुक्कुटवर्गीय पक्षी  आहे. या आकर्षक रंगाच्या सुंदर पक्षाला  भारताचा  राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली आहे. विणीच्या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच तो झडून जातो. जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडू शकतात. मोराचा विणीचा हंगाम पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक पिसारा असणारे व पिसारा फुलवून नाचणारे मोर जंगलांच्या किंवा झाडीच्या आसपास पाहायला मिळतात. गुजरात, राजस्थान या भागातील अनेक गावात शेतकऱ्यांच्या घरांच्या अंगणात मोर सहजपणे वावरताना आढळतात. महाराष्ट्रातील काही गावात मोर मनुष्य वस्तीच्या जवळपास आढळले तरीही ते माणसांपासून दूर वावरतात. मोर मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतात. मादीला म्हणजेच  लांडोरीला , पिसारा नसतो. एका मोराबरोबर अनेक लांडोरी थव्याने शेतात दाणे टिपताना आढळतात. मोर इंग्रजीत पिकॉक (peacock) किंवा pea fowl या नावाने ओळखला जातो. भारतात मोर पाळायला कायद्याने परवानगी काढावी लागते. जवळपास मोर ...